Shrirampur | युनूस पटेल यांनी केले 11 पोते गव्हाचे वाटप, ना नगरसेवक अथवा इतर कुठलं पद ; स्व.ससाणे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून ओळख

साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 एप्रिल 2020
श्रीरामपूर | ना नगरसेवक ना कुठले पदाधिकारी फक्त स्व.ससाणे साहेबांचे सच्चे कार्यकर्ते ही ओळख असणारे युनूस पटेल यांनी संजयनगर येथे अडचणीत असलेल्या कुटूंबाकरीता ११ पोते गव्हाचे वाटप केले आहे. 

          सध्या कोरोना आजाराचे संकट चालू आहे गेल्या 15 ते 20 दिवसापासून सगळंच ठप्प झाल्याने हातावरच्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. श्रीरामपूरात देखील काही ठिकाणची परिस्थिती गंभीर आहे. उपनगराध्यक्ष करण ससाणे होता होईल तेवढी मदत करतांना दिसत आहे. करण ससाणे हे आपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन करत आहे.  त्याअनुषंगाने युनूस पटेल यांनी आपल्या  संजयनगर परिसरात 11 पोते गहू देण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक कुटूंबाला 7 किलो प्रमाणे त्यांनी 150 कुटूंबाना जवळपास अकरा पोते चांगल्या प्रतीच्या गव्हाचे वाटप केले आहे.


 आजची परिस्थिती बघता श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांची आठवण श्रीरामपुकारकरांना  येत आहे.  स्व.ससाणे साहेबांचे शिलेदार श्रीरामपूर शहर व तालुक्यात  वेग-वेगळ्या स्वरुपात मदत करतांना दिसत आहे.
           यावेळी युनूस पटेल म्हणाले की, श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांची खऱ्या अर्थाने कमतरता भासत आहे. स्व.ससाणे साहेबांनी काही करुन श्रीरामपुरातील गरजूंना आश्या परिस्थितीत निदान दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था केली असती. सध्याची परिस्थिती खूप भयावह आहे म्हणूनच  11 पोते गव्हाचे वाटप केले आणि गरज पडल्यास आणखी मदत करणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. करण ससाणे यांनी युनूस पटेल यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post