Belapur : बेलापूर खुर्द मध्ये गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ; सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन

साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 एप्रिल 2020
बेलापूर, (सुहास शेलार) येथील ग्रामस्थांच्या सहभागातून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम ग्रामीण भागावर मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. अर्थार्जनाची साधने ठप्प  झाल्याने हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरीबांवर उपासमारिची वेळ आली आहे. अशा गरजूंच्या चुली पेटत्या राहव्या या भावनेतून अनेक सेवाभावी व्यक्ती मदतीचा हात पुढे करीत आहेत. "प्रेरणेतूनच देश घडतो" या उक्तीचा परिचय देत, यातून प्रेरणा घेऊन बेलापूर खुर्द येथील प्रा.अशोक बडधे, सुपेकर गुरुजी, सुनील क्षीरसागर, डॉ.रविंद्र महाडिक, विलास खर्डे, राजेंद्र कुंकूलोळ, मकरंद महाडिक, दिनेश पुजारी, भाऊसाहेब म्हसे, चांगदेव महाडिक, पत्रकार विष्णूपंत डावरे, शरद पुजारी, सुनिल बारहाते, पोलीस पाटील युवराज जोशी, दिलीप बडधे आदी सेवाभावी ग्रामस्थांच्या सहभागातून बेलापूर खुर्द गावठाणातील अर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब असलेल्या कुटुंबांना तसेच विधवा, निराधार व सद्यस्थितीत रोजगार नसल्याने अडचणीत असलेल्या ३५ कुटुंबांना सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून जीवनावश्यक वस्तूंचे मदत म्हणून वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित सर्व संयोजकांना सॕनेटराईज करण्यात आले होते. त्याचबरोबर उपस्थितांना मास्क लाऊन, सोशल डिस्टन्सिंग सारख्या सुरक्षेच्या सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गावातील सहयोग सामाजिक मंचच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी गावातील मोजके मान्यवर उपस्थित होते.
       संयोजकांनी सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन केले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित सर्व संयोजकांना सॕनेटराईज करण्यात आले. सामाजिक अंतर ठेवत (Social Distancing) आखलेल्या चौकोनात उपस्थितांना बसविण्यात आले. सर्वांनी मास्क लावले होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post