साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 एप्रिल 2020
बेलापूर |श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील श्री हरिहर केशव गोविंद संस्थान बन यांचे वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख रुपयांचा धनादेश श्रीरामपूरचे तहसिलदार प्रशांत पाटील यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.
श्री हरिहर केशव गोविंद संस्थान बन यांचे वतीने एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आली. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाबरोबरच अर्थिक संकटही वाढत चालले आहे. त्या अनुषंगाने दानशुर व्यक्ती, सहकारी संस्था तसेच मंदिरे-देवस्थानेही मदतीसाठी पुढे येत आहेत.
यावेळी संस्थानचे मार्गदर्शक प्रा.बापुसाहेब किसनराव पुजारी, अध्यक्ष ज्ञानदेव त्रिंबक भगत,सचिव कारभारी हरदास, पत्रकार प्रा.ज्ञानेश गवले, शरद पुजारी आदी उपस्थित होते. या संदर्भात बोलताना विश्वस्त प्रा. बापुसाहेब पुजारी म्हणाले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चालू असलेल्या उपाय योजनांसाठी लागणारे अर्थिक सहाय्य करण्याचा आम्ही हा अल्पसा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असलेल्या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून संस्थानच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप चालू असल्याचे सांगितले.