Ghodegaon : कोरोनामुळे श्री घोडेश्वरी देवी यात्रामहोत्सव रद्द

साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 एप्रिल 2020
नेवासा (दादा दरंदले),अहमदनगर जिल्ह्यातील व नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध, व वैभवशाली असणारा घोडेगाव येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. येत्या 10 एप्रिल पासून ही यात्रा सुरू होणार होती.सोनई पोलिस स्टेशन चे स.पो.नि जनार्दन सोनवणे व यात्रा कमिटी चे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांच्यात झालेल्या चर्चे मधे सर्वानुमते हा यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


        चार ते पाच दिवस भरणाऱ्या या यात्रेत दरवर्षी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.परंतु कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ घोडेगाव यांनी हा यात्रा उत्सव जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार रद्द केला आहे.

गावातील सर्व युवकांना सूचित करण्यात येत आहे की कुणीही पायी कावडीचे पाणी आणण्यासाठी प्रवरासंगम येथे जाऊ नये.

⚫कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक, धार्मिक, किंवा इतर सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आले आहे

⚫कुणीही सुवासिनी, शेरणी वाटप वा इतर नवस विधीसाठी देवी मंदिरात प्रवेश करू नये अथवा दर्शनासाठी येऊ नये असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे

⚫प्रत्येकाने आपापल्या घरी देवीच्या फोटोला नैवेद्द दाखवून विधिवत पूजा करून आपली मनोकामना पूर्ण करावी.

⚫कुणीही घराबाहेर पडू नये व प्रशासनाला व श्री घोडेश्वरी देवी यात्रा कमिटीला सहकार्य करावे अशी विनंती श्री घोडेश्वरी देवी यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post