Rahuri : महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार महाराजांना शासनाने तातडीने कायमस्वरूपी मानधन सुरु करावे ; संभाजी दहातोंडे

साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 एप्रिल 2020
राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे माध्यमातून समजा प्रोबधन करणारे राज्यातील सुमारे तीस हजार महाराज मंडळींना महाराष्ट्र शासनाने त्वरित कायमस्वरूपी दरमहा मानधन सुरू करण्यात यावे, अशी मागणी मराठा सेवा संघाचे संभाजीराजे दहातोंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कडे केली आहे.


        याबाबत मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या तातडीच्या पत्रात संभाजीराजे दाहतोंडे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील वारकरी सामप्रदयाची जपणूक करून अहोरात्र लोकांचे प्रबोधन करून हिंदू  धर्माची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्याचे काम विविध जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार करतातच मात्र प्रसिद्धी पासून वंचित राहून सदा सर्वदा वारकरी संप्रदायासाठी स्वतःला वाहून घेणारे अनेक महाराज मंडळींना कोणताही आधार नाही.आपल्या ला मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधन वर ते आपली गुजराण करत आहेत. आजच्या लॉक डाऊनच्या काळात अनेक महाराज आर्थिक दृष्टीने अत्यंत हवालदिल झाले आहे.अनेक सामाजिक संघटना या लॉक डाऊनच्या काळात लोकांना मदत करीत आहेत, शासन ही अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मदत करीत आहेत.मात्र कीर्तन क्षेत्रात काम करणारे टाळकरी,पखवाज वादक,गायक यांचे आहे अनेक छोटे मोठे कीर्तनकार आज संकटात आहेत.सध्या कॊरोना संकटात लॉक डाऊन मुळे सर्वत्र हरीनाम सप्ताह,कीर्तन सेवा बंद आहेत व भविष्यातही कधी सुरू होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे या सर्वांचा तातडीने प्रत्येक जिल्हा अधिकारी मार्फत सर्वेक्षण करून सध्याच्या काळात त्वरीत मानधन देण्यात यावे.हे मानधन कायमस्वरूपी दरमहा देण्यात यावे अशी मागणी संभाजी दाहतोंडे यांनी केली आहे.
  
महाराष्ट्र राज्यात आर्थिक दृष्टीने सक्षम असणारे अनेक देवस्थान आहेत. ही देवस्थाने मोठी करण्यात या कीर्तनकार क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीचा वाटा आहे.या सर्व देवस्थानानी या सर्व तीस हजार महाराजांना दत्तक घेऊन त्यांना कायमस्वरूपी मानधन सुरू करण्याबाबतही विचार व्हावा अशी मागणीही संभाजी दाहतोंडे यांनी केली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post