साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 एप्रिल 2020
राहुरी फॅक्टरी ( ऋषिकेश राऊत ) देशभरात सध्या थैमान घातलेल्या कोरोना संकटामुळे लॉगडाऊन असून या काळात राहुरी फॅक्टरी येथील तरुणांनी वृक्षारोपण करून झाडे लावा देश वाचवा हा संदेश दिला आहे.
इतिहासात प्रथमच कोरोना सारखे मोठे संकट कोसळले आहे .कोरोनामुळे सर्वत्र लॉगडाऊन असून अनेक सामाजिक संघटना विवीध उपक्रम राबवित आहे. राहुरी फॅक्टरी कराळेवाडी भागातील साईनगर येथील युवकांनी एकत्रित येऊन वृक्षारोपण केले. वृक्षरोपण त्यास कोविड, कोरोना, लॉगडाऊन अशी विविध नावे दिली आहेत. याप्रसंगी बिटू पवार, अन्सार शेख, रामेश्वर तोडमल, बाळू भंडारी, संदीप शेळके, योगेश जाधव, अविनाश कमलापुरकर आदी उपस्थित होते.