साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 एप्रिल 2020
बोरी फाटा (भाऊ कदम) राहुरी तालुक्यातील बोरी फाटा परिसरातील वांजुळपोई तिळापुर कोपरे शेणवडगाव पाथरी मांजरी इत्यादी परिसरात गहू हरभरा कांदा काढणीला सुरुवात झाली आहे.
मात्र उन्हाचा कडाखा चाऱ्याची टंचाई यामुळे गव्हाच्या भूशाला सोन्याचे भाव आले आहे. हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. या परिसरात सध्या कांदा पिकाची काढणी आणि गव्हाची सोंगणी जोरात सुरू आहे. मात्र यंदा हार्वेस्टरची मागणी, चारा टंचाईमुळे कमी झाली आहे. तर सोंगणी करून जनावरांसाठी भुसा मेळावा या हेतूने शेतकऱ्यांनी सोंगणीला महत्व दिले आहे. मात्र यंदा सोंगणीला सुगीचे दिवस आहे. भुसा मिळावा यासाठी गोपालक शेतकऱ्यांचा गहू सांगून खळेकरून देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाचत आहे तर भुशाची विक्रीचा भाव समाधान कारक आहे एका पिकप गाडीच्या भूशाला तीन ते चार हजार रुपये मिळतात. कांदा काढणी जोर धरू लागली आहे मात्र काढणीचा दर भयानक असल्याने आणि कांद्याला भाव नसल्याकारणाने कांदा काढणी परवड णासे झाले आहे एकरी साडेनऊ ते दहा हजार रुपये मजुरी द्यावी लागत आहे. एवढे पैसे देऊनही मजूर मिळेनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या ऊन भयंकर वाढल्याने हिरवा चारा घास नका कडवळ जळू लागली आहे.