साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 एप्रिल 2020
टिळकनगर (वार्ताहर) कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागामधील दत्तनगर, टिळकनगर, सूतगिरणी परिसरातील व्यवसाय करणाऱ्यांना ठराविक काळासाठी आपली दुकाने चालू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्यासह परिसरातील छोट्या व्यवसायिकांनी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून एक महिन्यापासून सगळीकडे सरकारने लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यात ग्रामीण भागातील छोट्या व्यवसायिकांनी व नागरिकांनी ते अतिशय तंतोतंत पालन केले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा देणारे दवाखाने मेडिकल्स दुकाने यांचे अतिरिक्त कोणत्याही व्यवसायिकांनी आपली दुकाने उघडलेली नाहीत. आता परत सरकारने 3 मे पर्यन्त लाॅकडाऊनची घोषणा केली असल्याने ग्रामीण भागातील छोटे दुकानदार व्यवसायिक यांचे उदरनिर्वाह ज्या व्यवसायामुळे आहे. ते मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहे. त्यात इलेक्ट्रिक दुकान, हेअर कटिंग सलून, इलेक्ट्रिक रिपेरिंग, पंचर दुकान, मोटरसायकल रिपेरिंग, फॅब्रिकेशन दुकान, जनरल स्टोर, हार्डवेअरचे दुकाने, शेतीचे निगडित असलेले व्यवसायाचे दुकाने आदी व्यवसाय करणारे गोरगरीब दुकानदार यांची दुकाने अनेक दिवसापासून बंद आहे.
त्यामुळे छोटे व्यवसाय करणाऱ्यांचा आता प्रशासनाने तत्काळ विचार करून ठराविक काळासाठी तरी दुकाने सोशल डिस्टन्सचे नियम देऊन दुकाने चालू करण्याची परवानगी देण्यात यावी. यासाठी जिल्हाधिकारी सह प्रशासनाने परिसरातील स्थानिक भागातील पदाधिकारी व येथील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागातील काही ठिकाणी तरी तात्पुरता स्वरूपात ठराविक काळासाठी दुकाने चालू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मगर यांनी केली आहे.