साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 एप्रिल 2020
नेवासा (दादा दरंदले) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर नेवासा तालुक्याची सर्व प्रशासकीय जबाबदारी आहे. ह्या बिकट परिस्थितीला अत्यंत धडाडीने सामोरे जात असतानाच त्यांच्या आजोबांचे निधन झाले व त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु ह्या परिस्थितीतही दुःखाचे सावट बाजूला सारून त्यानी समाजहिताला प्राधान्य दिले. व्हिडिओ कॉलद्वारे आजोबांचे अंतिम दर्शन घेऊन त्यांनी करोना मुक्तीसाठी व समाजहितासाठी पुन्हा कार्यास सुरवात केली.