Ahmednagar | वीजबिल माफ करण्यात यावे ; आपचे डुंगरवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली मागणी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 13 एप्रिल 2020
अहमदनगर |कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्माण झाला तेव्हापासून ते हे संकट पूर्णपणे नष्ट होई पर्यंतच्या काळात शेतकरी ,छोटे व्यावसायिक , व्यापारी, संघटित असंघटित मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार  या सर्वांचे दिल्ली सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र  सरकारनेही विज बिल माफ करावे,  अशी मागणी आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


        संपूर्ण देशामध्ये कोरोना सारख्या भयानक विषाणूच्या प्रादुर्भाव निर्माण झाला हजारो नागरिक या रोगाशी लढत आहे. शासनयंत्रणा ही चोख जबाबदारी पार पाडत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाँक डाऊन काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन  सरकार करीत आहे. देशातील संपूर्ण आर्थिक चक्र थांबलेले आहे.  दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे त्यामुळे देवाण-घेवाण ठप्प झाली त्यामुळे शेतकरी व्यापारी संघटित व असंघटित कामगार यांच्यावर आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजगार नाही, शेती मालाला बाजारपेठेत उठावा नाही, त्यामुळे  सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. याची काळजी महाराष्ट्र सरकारने घेऊन दिल्ली सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही 200 युनिट लाईट बिल काही महिन्यांसाठी  तरी माफ करण्यात यावे शक्य झाल्यास कायमस्वरूपी करावे,असे डुंगरवाल यांनी म्हंटले आहे. 

दिल्ली सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही 200 युनिट लाईट बिल काही महिन्यांसाठी  तरी माफ करण्यात यावे शक्य झाल्यास कायमस्वरूपी करावे. 
         तसेच ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, यांनी घरपट्टी, पाणीपट्टी ,दुकान पट्टी, तीन महिन्यासाठी माफ करण्यात यावी. सरकारी-निमसरकारी सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांची यावर्षीची इथून पुढची फी माफ करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच कोरोना विरोधात लढाईमध्ये आम्ही महाराष्ट्र सरकार सोबत आहोत, असेही तिलक डुंगरवाल  म्हणाले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post