साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 एप्रिल 2020
अहमदनगर|अहमदनगर जिल्ह्याची आता हळूहळू कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असल्याचे दिसत आहे. जिल्हयातील 8 कोरोनाबाधित व्यक्तींचे उपचारानंतरचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात संगमनेर येथील 4 व जामखेड येथील 4 असे 8 कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, यापूर्वी 4 जणांना यशस्वी उपचारानंतर आधीच डिस्चार्ज दिलेला आहे. आता जिल्ह्यातील एकूण 12 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
जिल्हातील संगमनेर शहरातील 3 आणि आश्वी बुद्रुक येथील 1 असे चारही करोणाबाधित रुग्णांच्या उपचारानंतरच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना आज ( दि. 19) बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देऊन, संस्थात्मक अलगीकरणासाठी संगमनेर दाखल करणार आहे. या चारही व्यक्ती आता कोरोनामुक्त झाल्या आहेत. तसेच जामखेड येथील 4 कोरोना बाधीत रुग्णांचा 14 दिवसानंतर दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. संस्थात्मक अलगीकरणसाठी जामखेड येथे दाखल करणार आहे. या व्यक्ती आता कोरोनामुक्त झाल्याची माहिती, जिल्हा आरोग्य यंत्रणेनी दिली.