साईकिरण टाइम्स ब्युरो, 7 एप्रिल 2020
श्रीरामपूर| कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर धोक्याची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण देशभरात कडकडीत बंद पाळला जात आहे. पोलीसांनी शहरात नागरिकांना घरात रहायला भाग पाडले आहे ; असे असले तरी ग्रामीण भागात मात्र हा कडकडीत बंद अयशस्वी ठरतानां दिसत आहे. एकिकडे शहरे ओस पडताना दिसत असतानाच दुसरीकडे अनेक खेडी मात्र फुलायला लागल्याचे धक्कादायक चित्र दिसुन येते आहे. या शिवाय ग्रामीण भागात अवैध धंदयानांही ऊत आल्याचे धक्कादायक चित्र दिसुन येते आहे.
कडकडीत बंदच्या पार्श्वभूमीवर हातभट्टी दारु विक्रीतही धक्कादायक रित्या वाढ झाल्याचे भयावह चित्र दिसत आहे. या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाचा कानाडोळा आहे. असुन बेकायदेशीर अवैध धंदयानां आळा बसेल का? असा सवाल यानिमीत्ताने उपस्थित होते आहे. दरम्यान, एकीकडे देशभरात कडकडीत बंद पाळला जात असताना ग्रामीण भागात सर्रास नियम पायदळी तुडवत कडकडीत बंदचा फज्जा उडाला आहे. पोलीस प्रशासन शहरातच अडकुन पडले असुन ग्रामीण भागाकडे संबधिताचे दुर्लक्ष झाले आहे. याचा गैरफायदा अनेक समाज कंटक प्रवृत्तीनीं उचलला असुन अवैध धंदे जोमात सुरू आहे.
पोलीस पाटील अकार्यक्षम
कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर गावा गावात दक्षता घेण्याचे आदेश पोलीस पाटलांना प्रशासनाने दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र गावा गावात पोलीस पाटील निष्क्रिय दिसत आहे. गावातील नागरिकांना कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात ये नाही. तर दुसरीकडे अवैध धंदे संबंधितांच्या डोळ्यासमोर बिनदिक्कत पणे सुरु आहे. एकुणच गावांची सुरक्षा वाऱ्यावर दिसत आहे.