Chanda : श्री.सोमेश्वर पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस २१ हजारची मदत

साईकिरण टाइम्स ब्युरो, 13 एप्रिल 2020
नेवासा (दादा दरंदले) कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी शासनाच्या बरोबरीने अनेक मदतीचे हात पुढे येत असून मा.खा.यशवंतराव गडाख साहेब यांची प्रेरणा घेत नेवासा तालुक्यातील चांदा येथील श्री सोमेश्वर पतसंस्थाच्या वतीने  कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ हजार रुपयांचा धनादेश मंडल अधिकारी मिलिंद जाधव यांच्याकडे पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. कारभारी जावळे(माजी सभापती नेवासा) यांनी सुपूर्द केला.

        सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशातील सर्व राज्यांमध्ये झाला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणे, गोरगरीब मजूर, स्थलांतरित कामगार यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करणे, सर्व ठिकाणांची स्वच्छता करुन जंतुनाशकांची फवारणी करणे यांसारख्या अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर श्री सोमेश्वर पतसंस्था यांनी मुख्यमंत्री सहायता निधी 21 हजार रुपये मदत करण्यात आली आहे यावेळी  बाबुराव चौधरी,डॉ विनोद गुंदेचा,रवींद्र जावळे मा.ग्रा.प.सदस्य, मॅनेजर भगवान घागरे सर्व संचालक मंडळ व पत्रकार देविदास चौरे आदी उपस्थित होते. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post