साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 एप्रिल 2020
टिळकनगर (वार्ताहर) दिव्यांग बांधवांना देण्यात येणारी आर्थिक मदत खूप मोठी नसली तरीही त्यातून मिळणारे समाधान लाख मोलाचे आहे. दिव्यांगाना केली जाणारी आर्थिक मदत व पाठीवरून मायेचा हात त्यातून त्यांना एक प्रकारची शक्ती मिळते. आपल्याकडून सत्कार्य झाल्याचे समाधान प्राप्त होऊन सामाजिक कार्याची ऊर्जा व समाधान मिळते असे प्रतिपादन एकलहरे ग्रामपंचायतचे उपसरपंच रवींद्र भालेराव यांनी केले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग नागरिकांना सहाय्य व्हावे यासाठी तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायतीने 5 % निधीतून दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
तसेच आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांनाही धनादेश देण्यात आले. ग्रामपंचायतीचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भालेराव पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, जेणेकरुन दिव्यांग बांधवांचे जीवन सुखी होण्यास मदत होईल.
याकामी पत्रकार लालमोहमद जहागीरदार, तंटामुक्तीचे अध्यक्ष सिराज आलम, एकलहरेच्या सरपंच लक्ष्मी उमाप, उपसरपंच रवींद्र भालेराव, माजी उपसरपंच नसिमखातून जहागिरदार, ग्रामपंचायत सदस्य म्हसू काका सुरडकर, राजू पटेल, सुरेश बर्डे, वैशाली मकासरे, बेबी रावण निकम, अर्जुन मकासरे, गणेश उमाप, पत्रकार रिजवान जहागीरदार सह ग्रामपंचायत कर्मचारी विश्वास काळे, राजू निकम आदींनी विशेष परिश्रम घेतले.