साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 मार्च 2020
मुंबई : राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या शंभरी पार झाली असून ही राज्यासाठी धोक्याची घंटा बनू पहात आहे .राज्यात 101 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे .कालपर्यंत हा आकडा 97 इतका होता त्यामध्ये आणखी 4 रुग्णाची भर पडली असून पुण्यातील 3 आणि सातारा येथील एकाचा समावेश आहे.