श्रीरामपूर : दबा धरून बसलेल्या बिबट्याने गाडीचा पाठलाग केला ; अन् थोडक्यात बचावले....


(प्रतिकात्मक छायाचित्र )
साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 मार्च 2020
श्रीरामपूर : गेल्या महिन्यापासून प्रवरा परिसरातील गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या वारंवार घटना घडत असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परिसरातील धनवाट रोड रस्त्यालगतचे सोमनाथ कोळपे हे गावातून डेअरीला दुध टाकून घरी जात असतानाच जगधने यांच्या शेतात जवळ शैरीच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने कोळपे यांच्या गाडीचा पाठलाग केला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले. ही घटना रविवारी ( दि.22) घडली.  

          या परिसरात गेल्या अनेक  दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना ताज्य घडत आहे. वनविभागाला वारंवार विनंती करूनदेखील  धनवाट व लम्हाणबाबा परिसरात नवीन पिंजरे लावण्याची  मागणी करण्यात आली होती. शेतकर्‍यांकडुन वेळोवेळी याप्रकरणी सुचना दिल्या जात होत्या पण अद्यापपर्यंत परिसरात पिंजरा बसविण्यात आलेला नव्हता. धनवाट परिसरात बिबटयाचा  मोठ्या प्रमाणावर वावर असल्याने भीतीच्या सावटाखाली शेतकरी वावरत आहेत.
दोन दिवसांपुर्वीच लम्हाणबाबा शिवारातील योगेश रोकडे यांचे कूत्रे पोर्च मधून बिबटयाने त्यांच्या डोळ्यात देखत कुत्रे उचलून नेले होते.शेजारील उसाच्या शेतात जावून बिबटयाने कुत्रे फस्त केले होते. धनवाट परिसरात आणखी काही बिबटे असल्याचे बोलले जात असून मादी व बछडे असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे.वनविभागाने तातडीने धनवाट परिसरात व लम्हाणबाबा शिवारातील बिबटया वावर असलेल्या ठिकाणी नवीन पिंजरे लावण्यात यावेत, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश अण्णासाहेब थोरात व लम्हाणबाबा मित्र मंडळानी मागणी केली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post