श्रीरामपूर : श्रीरामपूरकरांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी झुंबड ; किराणा दुकानातही गर्दी


                CORONA EFFECT 

साईकिरण टाइम्स ब्युरो, 24मार्च 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूरकरांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी आज मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान  ( दि. 24) मोठी  झुंबड उडाली. किराणा दुकानातही सामान घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. दरम्यान कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केलेली केलेली असल्याने शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. सोमवारी रात्रीपासूनच  शहरातील  प्रमुख चौकात बॅरिकेटस लावण्यात आलेले आहेत. 31 मार्चपर्यंत पेट्रोल व डिझेल सकाळी 5 ते 9 वाजेच्या दरम्यान चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सोमवारी (दि.23) जारी केलेले आहेत.  
             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी  लागू केलेली आहे.  अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे. शिवाजी महाराज चौक, भगतसिंग चौक, नगरपालिकेसमोर  तसेच इतरही ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  
         शहरात आज दुपारी 12 वाजेपासून भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. शहरातील भगतसिंग चौक,  मोठ्या पाटाजवळ भाजपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. भाजीविक्रेत्यांजवळ ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. कर्मवीर चौक परिसर, गोंधवनी रस्त्यावरील दशमेश चौक परिसर, कॅनॉल लगतच्या परिसर आदी ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. किराणा दुकानातही नागरिकांनी सामान खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली. पिठाच्या गिरणीतही लोकांनी गर्दी केली. भाजीपाल्याचे दरही इतर वेळेच्या तुलनेत जास्त होते.

             --- भाजीपाल्याचे दर ----

कांदे - 30 रुपये किलो 
बटाटे - 30 रुपये किलो 
लसूण - 30 रुपये पावशेर 
शिमला मिरची - 15 ते 20 रुपये पावशेर 
कोथिंबीर - 10 रुपये जुडी 
दोडके - 20 रुपये पावशेर 
टोमॅटो - 30 रुपये किलो 
मेथी - 25 ते 30 रुपये गड्डी 
पालक - 20 रुपये
भोपळा - 10 रुपये 
कोबी - 10 ते 20 रुपये 
गवार - 30 रुपये पावशेर 
भेंडी - 15 ते 20 रुपये पावशेर 
लिंबू - 20 ते 25 रुपये पावशेर 
मिरची - 15 ते 20 रुपये पावशेर 




  

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post