कोरोनापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आपणच आपली काळजी घ्या.
साईकिरण टाइम्स ब्युरो
पूर्ण जगामध्ये कोरोना ( Corona Virus ) विषाणूने थैमान मांडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला वौश्विक महामारी घोषित केले आहे. चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसने मानवी जीवन विस्कळीत केले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पासून बचावासाठी काळजी घेतल्यास या रोगावर नियंत्रण येऊ शकते.
• रुग्ण खोकल्यावर रुग्णाच्या मुखावाटे अतिशय सूक्ष्म तुषार हवेत उडतात. हे तुषार हवेमध्ये मिसळतात. तुषारांमधील सूक्ष्म कणांत कोरोनाचे विषाणु असू शकतात. सभोलतालच्या व्यक्तींनी श्वास घेतल्यास श्वसावाटे हे विषाणु मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. त्यासाठी एकमेकांशी बोलतांना, संवाद साधतानी ठराविक अंतर ठेवावे. विशिष्ट प्रकारचा मास्क तोंडाला लावावा.
• थंड पदार्थ खाणे टाळावे. थंड पदार्थाचे सेवन करू नये.
• जास्तीतजास्त उन्हात उभे राहावे.
• गरम पाणी प्यावे
• सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
• एकच वस्तूला अनेक लोकांचे स्पर्श होणाऱ्या वस्तूला स्पर्श करू नये.
• वेळोवेळो साबणाने हातपाय शरीर स्वच्छ करावे.
• कोरोना विषाणू 5 ते 10 मिनिटं जीवंत राहू शकतो दरम्यानच्या काळात विषाणूचा एकमेकांशी संपर्क आला तर संसर्ग होतो. त्यासाठी स्वच्छता राखावी. काळजी घ्यावी.
• कपडे साबणाने वारंवार स्वच्छ धुवावे. कडक उन्हात वाळत घालावे.
• लक्षणे : कोरोना विषाणू मानवाच्या घशात संसर्ग करतो. कोरोनाच्या प्रादुर्भावनानंतर घसा खवखवतो. त्यांनतर हा विषाणू श्वसनसंस्थेतील द्रवामध्ये मिसळतो. श्वसननलिकेतील फुफ्फुसांना बाधित करतो.
Tags
आरोग्य