साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 13 मार्च 2020
अहमदनगर | अहमदनगर मध्ये दुबई येथे जाऊन आलेला एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही होऊ लागला आहे.
सदर रुग्ण सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आला असून त्याची प्रकृती स्थिर व चांगली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या रुग्णात अद्याप सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून आली नाहीत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे अवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.