साईकिरण टाइम्स ब्युरो
पैठण |दि 13 मार्च 2020|पैठण येथील नाथषष्ठी यात्रा कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने ऐनवेळेवर रद्द केल्याने पैठण शहरातील व बाहेरच्या व्यापाऱ्यांना कोट्यावधींचा फटका बसणार आहे. वर्षभर हे व्यापारी नाथषष्ठी यात्रेची प्रतिक्षा करतात. नाथषष्ठी सोहळ्या दरम्यान ४०ते५० कोटीहून अधिक रुपयांची व्यापाऱ्यांची अर्थिक उलाढाल असते. यंदा मात्र व्यापारी अडचणीत आले आहेत.
नाथषष्ठी यात्रेत व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र भरातून व्यापारी येतातच शिवाय गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातील व्यापारीही हजेरी लावतात. नाथषष्ठीसाठी पैठण शहरातील व्यापारी महिना भरापासून तयारी करतात, शहरातील वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता किराणा माल व कापड मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी भरून ठेवले आहे.वर्षभरात जेवढा किराना माल विकला जातो तेवढा माल षष्ठी कालावधीत विकला जातो. यामुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने नाथषष्ठी यात्रेचे मोठे महत्त्व आहे. एकंदरीत स्थानिक व बाहेरचे व्यापाऱ्यांची मिळून नाथषष्ठी यात्रेत ४० ते ५० कोटीहून अधिक रूपयांची उलाढाल होते.
Tags
प्रादेशिक