मुंबई | पूर्ण जगात कोरोना वायरसने थैमान घातले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला वैश्विक महामारी घोषित केले आहे. भारतातही कोरोनाचा अनेक ठिकाणी प्रसार झाला आहे. देशभरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 31 रुग्ण आढळले आहेत.
राज्यातल्या करोनाग्रस्तांची संख्या 31 वर गेली आहे. आणखी पाच जणांचे रिपोर्ट सकारात्मक आल्याने महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही 26 वरुन थेट 31 वर पोहचली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात एकूण 15 रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. पाचमध्ये एक जण थायलंडहून आला आहे, तर इतर चार हे एकाच कुटुंबातील आहेत. चार रुग्ण दुबईहून आलेल्या एका करोना बाधित रुग्णाच्या घरातील आहेत. त्याच्या संपर्कात आल्याने या चौघांना कोरोनाची लागण झालेली आहे. शुक्रवारी ही संख्या 19 च्या घरात होती. मात्र एका दिवसात महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्याही 12 ने वाढली आहे. यापैकी पुण्यात- 10, मुंबई- 5, पनवेल- 1, कल्याण- 1, नवी मुंबई- 1, नागपूर- 4, ठाणे- 1, यवतमाळ- 2, अहमदनगर- 1 रुग्ण आढळले आहेत.