साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 14 मार्च 2020
अहमदनगर | अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून कोरोनाचे 3 संशयित रुग्ण आज शनिवारी ( 14 मार्च ) पसार झाले आहेत. समाजाच्या दृष्टीने ते घातक ठरू शकते. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हे रुग्ण जिल्हा रुग्नालयाच्या आयसोलोशन वॉर्ड येथे शनिवारी 14 मार्चला आंतररुग्ण म्हणून दाखल झाले होते. ते कोरोना संशयित असल्याने समाजाच्या दृष्टीने घातक सिद्ध होऊ शकतात त्यामुळे त्यांना पकडून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करावे, अशी तक्रार अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये केली आहे.