CORONA BREAKING | कोल्हापूर | कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयित वृद्धाचा मृत्यू



साईकिरण टाइम्स ब्युरो | 16 मार्च 2020 कोल्हापूर|महाराष्ट्रात कोरोना बाधितांची  संख्या वाढतच चालली आहे. अनेक कोरोना संशयित रुग्णालयात दाखल होत आहे. कोल्हापूरला एका कोरोना संशयिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाचे रिपोर्ट येण्याआधीच मृत्यू पावल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

           कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयित 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. संबधित व्यक्तीला 15 मार्चला कोरोना संशयित म्हणून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मृत व्यक्तीचे सॅम्पल्स तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. आज त्याचे रिपोर्ट्स येणार होते ; मात्र रिपोर्ट्स येण्याआधीचा या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच झालाय का हे रिपोर्ट्स हाती आल्यानंतर स्पष्ट होईल.

                  मृत व्यक्ती मूळ हरियाणाची रहिवाशी होती. मात्र कामानिमित्त हातकणंगले तालुक्यातील नागाव याठिकाणी राहत होती. संबंधित व्यक्तीने 8 मार्च ते 15 मार्च दरम्यान हरियाणा,दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर असा टॅक्सीने प्रवास केला होता.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post