साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 15 मार्च 2020
श्रीरामपूर | ग्रामीण पञकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2020 चा कर्तव्य दक्ष पोलिस आधिकारी पुरस्कार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांना घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण पत्रकार संघांचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी दिली.
पीआय श्रीहरि बहिरट यांनी श्रीरामपूर शहरात खाकीचा वचक दाखवत गुन्हेगारी मोडीत काढली. शहरात शांतता प्रस्थापित केली. तसेच हिन्दु - मुस्लिम यांच्यामध्ये सलोखा ठेवला. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहिर करण्यात आला.
ग्रामीण पञकार संघटनेची राज्य कार्यकारणी बैठक नूकतीच शिर्डी येथे पार पडली. यावेळी ग्रामीण पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दताञय खेमनर यांनी पुरस्कारची घोषणा केली. सदर पुरस्कार वितरण मंत्री महोदयांच्या हस्ते ग्रामीण पञकार संघाच्या अधिवेशात लवकरच होणार आहे.