साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 16 मार्च 2020
राहुरी |अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे नगर - मनमाड राज्यमार्गावर एका हॉटेलजवळ रविवारी ( दि. 15) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मृतावस्थेत बिबटया आढळून आला. दरम्यान वनविभागाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
![]() |
राहुरी | रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास राहुरीनजीक नगर मनमाड राज्यमार्गावर मृतावस्तेत बिबटया आढळला. |
रस्ता ओलांडतांना भरधाव वाहनाची बिबट्याला धडक लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिबट्याच्या डोक्याला मार लागला असल्यामुळे डोक्यावरून वाहन जाऊन बिबटया ठार झाला असावा. अपघातामुळे काही काल वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वनविभागाचे वनपाल गोरक्षनाथ लोंढे, सुरेश गायकवाड यांनी पंचनामा केला. सोमवारी बिबट्याचे शवविच्छेदन केले जाणार आहे.