अहमदनगर जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंप सकाळी 5 ते 9 या वेळेत चालू ; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 मार्च 2020
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेल विक्री ही दि.24 मार्च ते दि. 31 मार्च  या कालावधीत दररोज सकाळी 5 ते 9 या वेळेत सुरु राहील, असे आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

           कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.  

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post