Coronavirus Effect
साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 मार्च 2020
नेवासा|दादा दरंदले|कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर आज (रविवार) पाळण्यात येत असलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला घोडेगावकरां कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वयंस्फूर्त संचारबंदीमुळे शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट अनुभवायला मिळत आहे.
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रविवार दि.२२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकाळच्या वेळेस चांगला प्रतिसाद दिला असून सर्व व्यापारी दुकाने बंद आहेत यामुळे रस्त्यावर आणि गावात शुकशुकाट बघायला मिळत आहे.
चौकाचौकांमध्ये पोलीस कर्मचारी पाहायला मिळत असून खासगी दुचाकी किंवा खासगी मोटारींची अत्यंत तुरळक वाहतूक पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे तपासून सोडण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटाची पुरेशी जाणीव झाली असल्यामुळे नागरिकांकडून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वजण आपापल्या घरी किंवा आहे त्या ठिकाणी थांबल्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या अत्यंत नगण्य आहे.
-आम्ही घोडेगाव बंद साठी पूर्ण पणे खबरदारी घेतली असून कोरोना या रोगाचा प्रभाव थांबवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहोत.
-----श्री वसंतराव सोनवणे ग्रा पं सदस्य घोडेगाव
सकाळी ७ वाजल्या पासून नागरिकांनी बंद ठेवून उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. व सोनई पोलीस स्टेशनला सहकार्य केले आहे.यापुढे ही नागरिकांकडून असेच सहकार्य मिळावे हीच अपेक्षा."----- स.पो.नि.जनार्दन सोनवणे, सोनई पोलीस स्टेशन