साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 मार्च 2020
श्रीरामपूर | कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभर आज रविवारी (दि. 22) 'जनता कर्फ्यू' पाळण्यात येत आहे. पतंप्रधानांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूच्या आहवानाला श्रीरामपूरसह परिसरात सकाळपासुन उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोना विषाणू संसर्गाला जागतिक आरोग्य संघटनेनेही वौश्विक महामारी घोषित केले आहे. विविध उपाययोजना करूनही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. जनता कर्फ्यू परिस्थिती नियंत्रणात येऊपर्यंत वाढवण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात कॉरोनग्रस्तांची संख्या वाढतच असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अजून कठोर पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे.
सकाळपासूनच ‘जनता कर्फ्यू’ला श्रीरामपूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वयंस्फूर्त संचारबंदीमुळे शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट अनुभवायला मिळत आहे. शहरातील मुख्य रस्ता, नेवासा रस्ता, संगमनेर रस्ता, गोंधवनी रस्ता, शिवाजी महाराज रस्ता आदी सर्वच रस्त्यांवर सकाळपासूनच अभूतपूर्व शांतता पाहावयास मिळत आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यास आला आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानकातही आज पूर्ण शुकशुकाट पहायला मिळाला. मागील 2 दिवसापासून सोशल मीडियावरही जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात येत होते.
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रविवार दि.२२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकाळपासूनच वेळेस चांगला प्रतिसाद दिला आहे.
.
गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणार्यांवर पोलीसांनी कारवाई करावी.....
महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी असली तरी काही किराणा दुकानात, पानटपऱ्यात गुटखा मिळत असल्याने काही लोक गुटखा, मावा खाऊन रस्त्यावर ठिकठिकाणी पिचकाऱ्या मारून रस्ते घाण करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुम्रपान करून रस्ते अस्वच्छ करणाऱ्यांवर पोलीस व शासकीय यंत्रणेने कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.