अहमदनगर : रेशन दुकाने सुरू करावीत ; आपचे तिलक डुंगरवाल यांची मागणी

सरकारने रेशन दुकाने सुरू करावीत ; आपचे तिलक डुंगरवाल यांची मागणी 

साईकिरण टाइम्स ब्युरो, 31 मार्च 2020
श्रीरामपूर : 'लॉकडाऊन' मुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे त्यामुळे राज्य सरकारने रेशन दुकाने दिवसातील काही वेळ तरी खुली करावी व तिथून नागरिकांना अन्न व्यवस्था पुरवठा करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल यांनी केली आहे.  

         तिलक डुंगरवाल म्हणाले की,  सर्व छोटे-मोठे व्यवसाय,  असंघटीत क्षेत्रातील कामगार,  बांधकाम मजूर यांच्यापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुढील तीन महिन्यासाठी शिधापत्रिकेवर अतिरिक्त पाच किलो तांदूळ - गहू, एक किलो डाळ वाटप  दर व्यक्ती दर महिना देण्याचे जाहीर केले ; मात्र जिल्ह्यातील बहुतेक रेशन दुकान बंद असल्याचे  आढळून आले व जेथील  दुकाने चालू आहेत तेथे मार्चचा साठा संपलेला आहे. हे स्वस्त धान्य वाटप  एक एप्रिल नंतर सुरू होईल अतिरिक्त मोफत धान्य बाबत तर दुकानदारांना काहीच माहित नाही. केंद्र सरकार 80 कोटी नागरिक या योजनेचा फायदा घेतात असे म्हटले आहे. पण प्रत्यक्षात बहुतेक रेशन कार्डधारकांना या योजनेचा धान्य मिळत नाही विविध कारणे सांगून  धान्य नाकारले जाते.  

   वास्तविक, या संकट काळी सर्व केशेरी, पिवळ्या, पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना मोफत  रेशन देणे आवश्यक आहे. सध्या सरकारी कार्यालये  बंद असल्याने या कार्डचे नूतनीकरण व आधार जोडणी होऊ शकत नाही या अडचणी लक्षात घेता प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी कोणताही भेदभाव न करता सरसकट वाटप करण्याचे आदेश करावे. तसेच बाहेरील राज्यातील व दुसऱ्या गावातील लोकांकडे स्थानिक शिधापत्रिका नसल्याने त्यांना स्थानिक सामाजिक संघटनेच्या मदतीने मोफत धान्य पुरवठा करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने राज्याचे  अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे सर्व आयुक्तांकडे केली असल्याचे डुंगरवाल यांनी सांगितले.  

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post