साईकिरण टाइम्स ब्युरो, 21मार्च 2020
श्रीरामपूर : सध्या जगभरात कोरोना व्हायरस ( कोविद-१९ ) ने चांगलेच थैमान घातले असून त्याचा फटका भारतालाही बसला आहे, तसेच त्याचे सर्वात जास्त प्रभावित लोक महाराष्ट्रात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार राज्य सरकार व स्थानिक प्रशासन सद्य परिस्थिती अत्यंत शिताफीने हाताळत आहे. अशा अवस्थेत कोणत्याही नागरिकाची कुचंबना होणार नाही याचेही नियोजन प्रशासनाने उत्कृष्ठरित्या केले आहे. या सर्व परिस्थितीला जनतेने घाबरून न जाता खंबीरपणे स्वतःच्या व त्याचबरोबर इतरांच्याही आरोग्याची गंभिरतेने काळजी घेण्याची गरज आहे. असे आवाहन वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) चे श्रीरामपूर ( महाराष्ट्र ) चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
"जनता कर्फ्यू " पाळावा हे देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला भरभरून साद द्यावी असेही दत्ता विघावे यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.