साईकिरण टाइम्स ब्युरो, 20 मार्च 2020
श्रीरामपूर : कोरोना विषाणूंपासून बचाव व्हावा, व या विषाणूंची सफाई कामगारांना लागण होऊ नये, म्हणून आज शुक्रवारी (दि.20) नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण व कामगार नेते दीपक चरणदादा चव्हाण यांनी कामगारांना मास्कचे वाटप केले.
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली मास्कचे वाटप करण्यात आले. आदिक यांच्या सूचनेनुसार मास्क वाटपाचा कार्यक्रम एका जागी न घेता ठिकठिकाणी जाऊन मास्कचे वाटप करण्यात आले.
संपूर्ण श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी नगरपरिषदेचे कामगार घेत असतात व अशा संसर्गजन्य परिस्थितीत स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून स्वच्छतेचे कार्य करत आहेत. ही सामाजिक जाणिव ठेऊन व श्री चरणदादा चव्हाण व परिवार यांचे वर्षानुवर्षांचे कामगारांसोबत असलेले जिव्हाळ्याचे संबंध याचाच एक भाग म्हणून कामगारांना मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्रीरामपूर नगरपरिषदेचे कामगार बंटी चव्हाण, प्रसाद चव्हाण, सचिन चंडाले, लखन दाभाडे, संदीप जेधे, राहुल दाभाडे, लखन दांडगे, दीपक शेलार, सौरभ जाधव, अनिकेत दाभाडे, सोनू झिंगारे, उमेश झिंगारे, संदीप रागपसरे, अमोल मरसाळे, राकेश झिंगारे, आकाश शेळके, निलेश जाधव, प्रदीप बागडे, जितू झिंगारे आदी कर्मचारी उपस्थित होते.