साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 मार्च 2020
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या रात्रीतून वाढली आहे. ही संख्या 52 वरुन आज 63 वर गेली आहे. एका रात्रीत 11 रुग्णांची वाढ झाली आहे. देशात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. लोकं गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. म्हणून हे शहर 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यसरकारनं मुंबई महानगर प्रदेशासह नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या चार शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधं या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं व कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलं आहे. तसंच सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सुट्ट्या जाहीर केल्या असून फक्त 25 टक्केच कर्मचारी हजर राहतील असे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी 22 मार्चला जनता कर्फ्यूची घोषणा करत सर्व देशवासीयांना हा दिवस पाळण्याचं आवाहन केलं आहे.