साईकिरण टाइम्स ब्युरो | 20 मार्च 2020
घोडेगाव|दादा दरंदले|तालुक्यातील तरुण तडफदार पत्रकार कमलेश गायकवाड यांची केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर यांनी नियुक्तीचे पत्र गायकवाड यांना दिले आहे.
नगर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांत गायकवाड हे निर्भिड, सडेतोड वार्तांकन करणारे बहुआयामी पत्रकार म्हणून सुपरिचित आहेत. प्रिंट मिडीयाबरोबरच अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मिडीया यशस्वीपणे हाताळण्यात गायकवाड यांचा विशेष हातखंडा आहे. ग्रामपंचायत पासून विधीमंडळ, संसदेपर्यंत पत्रकारीतेचा भरगच्च अनुभव त्यांनी अत्यल्पावधीत मिळवला आहे. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराबरोबरच शेती, उद्योग, विकास पत्रकारीतेत त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. यातून त्यांचा अनुभव समृद्ध बनल्यामुळेच विविध सामाजिक, राजकीय संस्था संघटनांमध्ये त्यांना सामावून घेतले आहे. पत्रकारांच्या प्रश्नांवरही ते सजग राहून शासन दरबारी आवाज उठविण्याबरोबरच त्याचा पाठपुरावाही त्यांनी केलेला आहे.
गायकवाड यांच्या पत्रकारीता, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर यांनी त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्याबरोबरच महाराष्ट्राचे प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख, राज्यमंत्री ना.तनपुरे, आमदार सुधीर तांबे, मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप, काँग्रेस नेते शिवाजी जगताप, बंटी यादव, राजेंद्र वाघमारे संभाजी माळवदे, प्रविण साळवे, नेवासा एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास पठाडे,पत्रकार दादा दरंदले आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
Tags
प्रादेशिक