नवी दिल्ली : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण


        Coronavirus Breaking 
साईकिरण टाइम्स ब्युरो | 20 मार्च 2020
नवी दिल्ली | कनिका कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली असून तिने त्यामध्ये आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचंही स्पष्ट केलं आहे. काही दिवसापूर्वी ती लंडन वरून परतली होती. आता लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे.



            मीडिया रिपोर्ट्सनुसार, कनिका कपूरने कोरोनाची लागण झाल्याची गोष्टी लपवून ठेवली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर ती एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबली होती, एवढचं नाहीतर तिने डिनर पार्टीही ठेवली होती.


           कनिका कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली असून तिने त्यामध्ये आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचंही स्पष्ट केलं आहे. कनिका कपूर म्हणजे, बॉलिवूडमधील एक नामांकित नाव आहे. कनिकाने 'बेबी डॉल मैं सोने दी' हे प्रसिद्ध गाणं गायलं आहे. याव्यतिरिक्त काही रिअॅलिटि शोमध्ये कनिका जज देखील होती.
          सरकार  प्रयत्न करत असूनही देशातील रूग्णांची संख्या वाढत आहे. यावर प्रतिबंध म्हणून अनेक उपाययोजनाही लागू करण्यात येत आहेत. आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 195वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 163 भारतीय असून 32 विदेशी नागरिक आहेत.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post