श्रीरामपूर : जिल्हातील सर्व ग्रामपंचायतीना निर्जतुकिकरण करण्यासाठी सूचना द्यावी ; जि.प. सदस्य शरद नवले

साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 मार्च 2020
श्रीरामपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी  जिल्ह्यातील सर्व  ग्रामपंचायतीना ग्रामपंचायत हद्दीमध्ये   निर्जतुकिकरण करण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे  केली आहे. 

         नवले यांनी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोरोनाला आळा घालण्यासाठी  जिल्ह्यातील 1317  ग्रामपंचायत हद्दीत निर्जंतुकीकरण करण्यासाठी डॉक्टर  व तज्ञांच्या  मार्गदर्शनाने योग्य औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे.  ग्रामपंचायतीने १४ वित आयोग ग्रामनिधी व लोकसहभागातुन फवारणी करणे संबधी सर्व  ग्रामपंचायतीना आपल्या स्तरावरुन योग्य ते उचित आदेश द्यावेत, तसेच  नगर पंचायती व नगरपालिका व अहमदनगर महापालिका या ठीकाणी औषध फवारणीसाठी संबंधितांना  सुचित करावे, असेही  नवले यांनी म्हंटले   आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post