श्रीरामपूर : आंबी - देवळाली प्रवरा शिवारात उसाच्या शेतात सकाळी बिबट्याचे बछडे आढळले. |
साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 मार्च
श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर नजिक नरसाळी शिवारात औटी वस्तीवर बिबट्याने भरदिवसा मेंढ्याच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात एका मेंढीवर झडप घालून मेंढी उसात नेत फडशा पाडला आहे. ही घटना आज (29) नरसाळी शिवारात घडली. दरम्यान देवळाली प्रवरा शिवारात दिपक कोळसे यांच्या उसाच्या शेतात आज सकाळी बिबट्याचे 2 बछडे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नरसाळी येथे बिबट्याने मेंढीवर हल्ला केल्याने असल्याने लोकांनी औटी वस्तीवर गर्दी केली होती. दरम्यान राहुरी तालुक्यातील आंबी - देवळाली प्रवरा नजीक असणार्या दिपक कोळसे यांच्या ऊसाच्या शेतात आज सकाळीच दोन बिबटयाचे बछडे सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ऊसतोडणी कामगार कोळसे यांच्या शेतात ऊसतोडणी करत असताना ऊसाच्या सरीला दोन बछडे आढळून आले आहे. संबधीत शेतकर्यांनी वनविभागाला माहिती दिली असून वनविभागाचे अधिकारी दाखल झाले. नविन पिंजरे लावण्यात येणार असून घटना पुढील उपाययोजना सुरू झाली आहे.