Corona Breaking
साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 17 मार्च 2020
श्रीरामपूर|कोरोनाला गो करत श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील आठवडे बाजार आज मंगळवारी (दि.17) चक्क इंदिरानगरजवळ भरला. दर मंगळवारी शिरसगावचा आठवडे बाजार शिरसगाव ग्रामपंचतीसमोरील मंदिरालगतच्या मोकळ्या जागेत भरत असतो. शिरसगावसह श्रीरामपुरातील अनेक लोक या बाजारात येत असतात.
![]() |
जगभरामध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे वाढते प्रमाण तसेच महाराष्ट्रतील विषाणूबाधीतांची संख्या लक्षात घेता श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे भरणारा आठवडे बाजार आज बंद ठेवला होता ; शिरसगावचा बाजार बंद असल्यामुळे काही विक्रते इंदिरानगर-शिरसगाव रस्त्यालगत भाजीपाला विक्रीला बसले . परिसरातील नागरिकांनीही भाजीपाला घेण्यासाठी गर्दी केली. बाजारला चांगला प्रतिसादही मिळाला. बाजारात अगदी तुरळक लोकांनी चेहऱ्याला रुमाल बांधला होता. शिरसगाव परिसर, इंदिरानगर, श्रीरामपूर आदी ठिकाणच्या लोकांनी भाजीपाला घेण्यासाठी गर्दी केली. शिरसगावच्या आठवडे बाजारात दर मंगळवारी मोठी गर्दी होत असते. श्रीरामपुरातील बहुसंख्य लोकं शिरसगाव येथील बाजारात येत असतात.