कुरणपुरचे अमोल चिंधे यांची पी. एस.आय.पदी निवड



साईकिरण टाइम्स ब्युरो | 17 मार्च 2020
श्रीरामपूर |श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपुर येथील सरपंच सौ. शोभाताई लक्ष्‍मण चिंधे व लक्ष्मण रामजी चिंधे यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमोल लक्ष्मण चिंधे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली.  

            तसेच त्यांची मंत्रालय सहाय्यक कक्षाधिकारी दुसऱ्या परीक्षेतही ते उत्तीर्ण झाले. एकाच वेळेस दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणारे परिसरातील एकमेव उदाहरण आपल्याला म्हणता येईल प्रगतशील शेतकरी असणारे चिंधे कुटुंबीय त्यांना थोडासा राजकीय वारसा असून आई सरपंच वडील सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे अशा कुटुंबांमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हार तर पुणे येथील मेकॅनिकल कॉलेजमध्ये  अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले. जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल कुरणपूर गळनिंब, फत्याबाद, मांडवे, कडित, या पंचक्रोशी सह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. त्यांच्या यशाबद्दल माझी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील ,खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील ,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील देवकाते माजी उपसभापती, माजी उपसभापती अण्णासाहेब शिंदे यांच्यासह त्यांचे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन
होत आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post