साईकिरण टाइम्स ब्युरो,25 मार्च 2020
सोनई |किरण शेलार |शनिशिंगणापुर देवस्थानच्या चारशे वर्षाच्या इतिहासात प्रथमच गुढीपाडव्याला स्वयंभू शनिमुर्तीवर कावडीचे पाणी पडणार नाही.
परीसरातील शिवाजी चव्हाण,प्रकाश सोनवणे,मच्छिंद्र भगत,शिवाजी कु-हे,बाळासाहेब वडागळे,दत्ता कु-हे,महेश पतंगे,ज्ञानेश्वर सुर्यवंशी,अर्जुन होंडे,गजानन पंडीत,आण्णासाहेब गांगले,बाबासाहेब शिंदे,काशीनाथ लल्ला,तुकाराम तेजीकर हे चौदा शनिभक्त क्षेत्र काशी मोटारसायकल कावड यात्रेला गेले होते.
देवस्थान सुरक्षा विभागाने कोरोना संसर्गाची
काळजी म्हणून काशी(वाराणसी)येथून गंगेचे पाणी घेवून आलेल्या सर्व भक्तांना नगर-औरंगाबाद राजमार्गावर अडवून हे पाणी स्वयंभू शनिमुर्तीवर टाकता येणार नाही.असे सांगून सर्वांना त्यांच्या घरी काढून दिले.या शिवाय प्रवरासंगम येथून कुणीही
कावडीचे पाणी आणू नये असे आवाहन सुरक्षाधिकारी गोरख दरंदले यांनी सांगितले.
संपुर्ण गुढीपाडवा सोहळा रद्द केलेला असून महंत त्रिबंक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा होणार आहे.या आरती सोहळ्यास कुणासही परवानगी असणार नाही.असे जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी सांगितले.