आज संपुर्ण जगाला कोरोनाने ग्रासले आहे. विकसित व विकसनशील देश ही हतबल झाले आहेत. एका व्हायरसने संपुर्ण जगाला हादरा दिला आहे. जग कीतीही सुधारले असले तरी त्याला कायम नवीन प्रश्नांना सामोरे जावे लागेल. निसर्ग नियमाना व निसर्गाला डीवचुन चालणार नाही अन्यथा जगापुढे आणखी जास्त प्रश्न समोर उभे राहतील.
जग सुधारले. पैसा आला. स्पर्धा वाढली. परंतु माणसे प्रेम माया व कुटुंबही विसरले. खेडे आणि शहरे यातील दरी वाढत चालली. शहरे लोकांना भूरळ घालु लागली. आणि नंतर त्याच्या विळख्यात अडकून पडू लागली. गाडी घोडा बंगला यातून बाहेर पडता येईना. गाव, खेडे, कुटुंब, माणसे, जमीन याला विसरून गेली. जेव्हां शहराला कोरोणाने घेरले तेंव्हा गावची आठवण आली. गावात आले तरी गाव संशयानी पाहु लागले त्यामुळे घरात बसावं लागलं. मग करायचं काय म्हणून कुटुंबातील संवाद वाढू लागला आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे हे विसरून कारखान्यातील चाक बनुन फिरू लागले होते. आत्ता लोकांच्या लक्षात नक्की पोहचले आहे गाव गावातील माणसे आणि कुटुंब किती गरजेचे आहे. आज गुडी पाडवा आहे कर्ज काढून घेतलेल्या घरावर गुढी कोण बांधेल असा साधा विचारही त्यांच्या मनात आला नाही. कोरोना कुटुंब पद्धतीच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे असेच म्हणावी लागेल.
स्वातीताई मोराळे(८४९५८८३८६३)
राष्ट्रीय अध्यक्ष: ओबीसी फाऊंडेशन इंडिया.