साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 मार्च 2020
पुणे : सहाय्यक प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी 15 ते 20 जून दरम्यान घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांना 19 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या नेट परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे ( NTA ) असते. 17 एप्रिल पर्यंत परीक्षेचे शुल्क भरता येणार आहे. 15 ते 20 जून दरम्यान मध्ये होणारी नेट परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे. 15 मे 2020 ला परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध होऊ शकतील . 5 जुलै 2020 ला नेट परीक्षेचा निकाल लागणे अपेक्षित आहे.