आपल्या व्यवसायाची जाहिरात पोहोचवा असंख्य वाचकांपर्यंत
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
साईकिरण टाइम्स, संपादक - राजेश अरविंद बोरुडे. मो. 9960509441
Saikirantimes1@gmail.com
साईकिरण टाइम्स ब्युरो |7 मार्च 2020
श्रीरामपूर | शहारत ठिकठिकाणी असणारे विद्युत रोहित्रांवरील डीपी बॉक्सचे उघडे दरवाजे नागरिकांच्या जीवाशी जीवघेणा खेळ खेळत आहेत. शहरातील सर्वच छोटे मोठे प्रमुख रस्ते, शाळा, रुग्णालयांजवळ, बसस्थानकालगतचा परिसर, नागरी वसाहतींच्या परिसरात असणाऱ्या अनेक डीपींवरील डिस्टिब्युशन बॉक्सची झाकणे उघडे असल्याचे निदर्शनास आले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे पादचारी, कचरा वेचणारे महिला लहान मुले, वाहनचालक, शालेय बालके, नागरिकांंच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
अनेक विद्युत रोहित्रावरील डीपी बॉक्स हे जमिनीपासून अत्यंत कमी अंतरावर आहेत. शालेय विदयार्थी कचरा वेचणाऱ्या महिला लहान मुले यांचा हात त्या ठिकाणी सहज लागू शकतो. लहान मुले, महिला यांचा प्ल्यास्टीक पिशव्या, भंगार गोळा करत असताना उघड्या डीपी बॉक्सला हात लागून मोठी दुर्घटना घडू शकते.
महावितरणने विजेचा दाब नियंत्रित करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी विद्युत रोहित्रांची व्यवस्था केलेली असून त्यावर विद्युत नियंत्रण करण्यासाठी डिस्ट्रिब्युशन बॉक्स लावण्यात आलेले आहेत. डिस्ट्रिब्युशन बॉक्स हा पूणतः बंद असणे आवश्यक आहे. ; परंतु शहरातील बहुसंख्य डीपीवरील बॉक्सची झाकणे पूर्ण, अर्धवट उघडी आहेत. शहरातील संगमनेर रोड, नेवासा रोड, बेलापूर रोड, थत्ते ग्राउंड परिसर, गोंधवनी रोड यांसह अनेक नागरी वसाहतीजवळ अनेक विद्युत रोहित्रावरील डीपी बॉक्सची झाकणे सर्रास उघडी आहेत. अनेक डीपीवरील विजेच्या तारा निखळून खाली लटकलेल्या आहेत. अनेक डिस्ट्रिब्युशन बॉक्स हे जमिनीपासून अतिशय कमी अंतरावर आहेत. भंगार गोळा करणाऱ्या महिला बालके यांचा वावर त्याठिकाणी असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेतील लहान बालके, कचरा वेचणाऱ्या महिलांचा उघड्या डीपी बॉक्सला हात लागून दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. रस्तयालगत उघडे जमिनीपासून अत्यंत कमी अंतरावर असलेल्या डीपीला छोटा मोठा अपघात होऊन वाहधारकाची धडक बसल्यास जीविताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अनेक डीपीवरील बॉक्सची झाकणे ही उघडे, गंजलेले, तुटलेले, जीर्ण झालेली आहेत. काही डीपीवरील बॉक्सची झाकणे अर्धवट लावलेली आहेत तर काही झाकणे दोऱ्यानी,सूतळ्यानी तारींनी बांधलेली आढळली.
______________________________________
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
साईकिरण टाइम्स, संपादक - राजेश अरविंद बोरुडे. मो. 9960509441
email Saikirantimes1@gmail.com
Tags
ताज्या घडामोडी