साईकिरण टाइम्स ब्युरो | 7 मार्च 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्यातील कडीत बु. येथे वडीतके वस्तीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि. 7) बिबटया जेरबंद झाला. मागील अनेक दिवसांपासून पंचक्रोशीत बिबट्याने धमाकूळ घातला होता. यापूर्वीही गळनिंब येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 3 वर्षीय बालिका मृत पावली होती.
मागील अनेक दिवसांपासून गळनिंब, फत्याबाद, कुरणपुर, पिंपळगाव, कडित, चांडेवाडी, ममदापुर परिसरात बिबट्याने धुमाकुळ घातला होता. बिबट्याने अनेकवेळा हल्लेही केले. गळनिंब येथील 3 वर्ष बालिकेवर बिबट्याने हल्ला केला होता त्यात बालिका मृत पावली होती.
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील धनवाट परिसरातील जगधने यांच्या उसाच्या शेतात रविवारी दि. 23 फेब्रुवारीला रात्री 9 वाजेच्या दरम्यान बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली होती. 22 फेब्रुवारीलाही रात्री चांडेवाडी येथेही बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकली होती. चांडेवाडी येथे अनेकवेळा दिवसा बिबट्याने दर्शन दिले होते वनखात्याने सतर्क राहुन या संपुर्ण भागात पिंजरे लावले होते. आत्तापार्यंत वनविभागाने चार बिबटे पकडले. आज शनिवारी (दि.7) ला कडित येथे मछिन्द वडितके यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात सकाळी 6 वाजेच्या दरम्यान बिबट्या जेरबंद झाला. हा बिबटया अनेक दिवसांपासून पिंजऱ्याजवळ घिरट्या मारत होता. वनरक्षक गोसावी यांनी लावलेल्या ट्रॅप कॅमेरात लक्षात आली. त्यांनी तात्काळ पिंजरात मांस व कोंबडी ठेवली. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यथ आले. याकामी, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अमोल गोसावी यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांना वनरक्षक एम एस इंगळे, वनरक्षक आदिनाथ भोसले, वनरक्षक विक्रांत बुराडे, वनरक्षक सुधाकर घोडके, वनमजुर बि जी खराडे घोडके, आर पी शेळके, वाहन चालक संजय पंढरे, गणेश शिंदे यांनी विशेष मदत दिली.