रस्त्यावरून पोलीसांनी तुमचे वाहन उचलले...! तर जाणून घ्या, वाहने उचलण्याचे नियम
साईकिरण टाइम्स ब्युरो
रस्त्यावर वाहने पार्क केल्यांनतर वाहतूक पोलीस, वाहनचालक व वाहन उचलणारी पिकअप व्हॅन यांच्यात अनेकदा वाद होतात, यासाठी वाहनचालकांना काही नियम माहिती असणे आवश्यक आहेत. वाहतूक पोलीस विभाग व पिकअप व्हॅन ( वाहन ) कॉन्ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या करारनाम्यानुसारनुसार
1) पिकअप व्हॅन मध्ये एक ड्रायव्हर, डिजिटल कॅमेराधारक, एक फोटोग्राफर, 4 कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी उवस्थित राहील.
2) पिकअप व्हॅन मधील कर्मचारी हे गुन्हेगारी रेकॉर्डमधील नसेल, यासाठी त्यांची पोलीस विभागाकडून चारित्र्य पडताळणी होणे आवश्यक आहे.
3) दुचाकी वाहन उचलण्यापूर्वी 5 मिनिट अगोदर अनाऊन्समेंट करणे, वाहन उचलल्यानंतर त्या जागी खडूने क्रॉसचे चिन्ह करून त्या चेंबर चे नाव लिहणे आवश्यक आहे.
4) वाहने उचलल्यानंतर त्या वाहनाचे कोणत्याही नुकसान विषयक जबादारी कॉन्ट्रॅक्टरची राहील.
5) कॉन्ट्रॅक्टरचे पोलीस विभागातील कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्याशी कोणतेही नातेसंबंध राहणार नाही.
6) पिकअप व्हॅनचे कर्मचारी यांनी रोज डार्क नेव्ही ब्लु शर्ट व पॅन्ट असा गणवेश परीधान करणे अनिवार्य आहे.
7) वाहने उचलतेवेळी त्यांचे व्हिडीओ शूटिंग होणे आवश्यक आहे.
--------- वरील अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यास पीडित वाहन धारक व जागरूक नागरिकांनी त्या कॉन्ट्रॅक्टर, पोलीस कर्मचारी, संबंधित पीआय व एसपी ची पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणी गृह विभागाचे अवर सचिव यांच्याकडे पुरावयासहित लेखी तक्रार देऊन त्यांच्यावर फौजदारी व निलंबन कारवाईची मागणी करावी.
-------- माहिती संकलन - शेखर कोलते, ( राज्य कार्याध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ )
Tags
माहिती अधिकार
मस्त माहीत फारच उपयोगी
ReplyDelete