उक्कलगावात बिबटयाने कुत्र्यांवर मारला ताव




साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 9 मार्च 2020 श्रीरामपूर|प्रवरा नदीपात्राशेजारील परिसरातील गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या वारंवार घटना घडत असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव कोल्हार रस्त्यानजीकच्या तांबे वस्तीवर बिबटयाने मोर्चा वळवला  असुन ज्ञानेश्वर रामचंद्र तांबे यांच्या द्राक्षांच्या बागेत बिबटयाने त्यांच्या कुत्र्यांवर, शेजारीच असलेल्या संदिप तांबे यांच्या पाळीव कुत्र्यांवर  द्राक्षांच्या बागेत दोन्हीही कुत्र्यांचा फडशा पाडला.



उक्कलगाव सह परिसरात वनविभागाने आणखी पिंजरे लावण्यात यावेत ; मागणी 
उक्कलगाव सह प्रवरा परिसरातील गावांमध्ये बिबटयाची संख्या किती, त्यामागील माद्याची संख्या,पिल्लांची संख्या किती हे अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही त्यामुळे वनविभागाने आणखी पिंजरे वेगवेगळ्या ठिकाणी नवीन पिंजरे लावण्यात यावेत अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत आहे. 




 रात्रीवेळी बिबटयाच्या भितीपोटी  घराबाहेरच पडणे झाले मुश्किल... परिसरात बिबटयाचा वावर वाढला असल्याने गावांमध्ये  येणार्‍या दुध व्यवसाय करण्याऱ्या  शेतकर्‍यांत घराकडे जाणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे शेतीकडे वास्तव्यास असलेल्या शेतकर्‍यांमध्ये घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.


             रविवारी (दि. 8 ) रोजी गावातील काही महिला गायांना गवत घेण्यासाठी आल्या असतानाच महिलांना बिबटयाने फडशा पडलेल्या कुत्र्यांचे अवशेष त्याठिकाणी दिसून  आले. तांबे वस्तीवरील घटना ताजी असतानाच पुन्हा मोरे वस्तीवर बिबट्याने येथील कुत्र्यांवर ताव मारला. अनेक दिवसांपासून सातत्याने बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना परिसरात घडत आहे.  त्यामुळे कोल्हार रस्त्यानजिक, धनवाट परिसरातील ओढ्यानजीकच्या थोरात वस्तीवर तावरे वस्तीवर बिबटयाने धुमाकुळ घातला असून, पुन्हा मारुती थोरात यांच्या घराजवळ बिबटया आल्याने गाया, वासरे भयभीत झाले. त्यामुळे बिबटयाच्या दहशतीमुळे रानातील शेतकर्‍यांमध्ये भिती वातावरण पसरले आहे. दरम्यान नवनाथ तांबे यांनी शेतात गव्हाला पाणी भरण्यासाठी रात्री गेले असता मादी व त्यामागे पिल्लू असल्याचे प्रत्यक्षात पाहिले होते. मागिल आठवड्यात रात्रीचा वीजपुरवठा असल्याने गव्हाच्या पिकांना पाणी भरण्यासाठी परिसरात  शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे.  

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post