श्रीरामपूर | महिलांनी चुकीच्या गोष्टीला विरोध केला पाहिजे तसेच अगोदर स्वतःचे करियर घडवून आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे, असे आवाहन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलिस अधिक्षक डॉ दिपाली काळे यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथे प्रियदर्शनी महिला तंत्रशिक्षण मंडळ श्रीरामपूर व साई खेमानंद मेडिकल फौन्डेशन यांच्या संयुक्त विघमाने जागतिक महिला दिना निमित्त आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी खा सदाशिव लोखडे , जेष्ठ पत्रकार रमण( आण्णा ) मुथा , डॉ चेतन लोखंडे , प्रियदर्शनी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार धनवटे , प्रफुल्ल वावसे, सुनिल दराडे , रत्नमाला धनवटे,राजश्री वावसे आदी सह उपस्थित होते डॉ दिपाली काळे यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांनी बोलायला शिकले पाहिजे. स्त्रीभ्रुम हत्या मी ठरवणार कुणाला जन्म दयायचा तो अधिकार माझा आहे स्त्री - पुरुष मानसिकता बाळगतो त्याला विरोध केला पाहिजे. जागतिक पातळीवर महिलांची दखल जात आहे त्यासाठी स्व:ता हा मध्ये बदल करण्याचे आवाहन डॉ दिपाली काळे यांनी केले डॉ चेतन लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
Tags
शैक्षणिक