साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 15 मार्च 2020
श्रीरामपूर |धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेवर घ्यावे, अशी मागणी भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे दताञय खेमनर यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खेमनर यांनी म्हंटले आहे की, नुकत्याच ७८ सदस्यांच्या विधान परिषदेतील १८ सदस्यांना त्यांच्या सदस्यांची मुदत संपली आहे.त्यापैकी भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला ३ सदस्य आहे. पक्षाने ऐक जागा धनगर समाज संघर्ष समितीला द्यावी. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत संघर्ष समितीने महायुतीचे काम अतिशय प्रमाणिकपणे केले होते.
समितीचे प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब शिंदे गेली २५ वर्षापासुन निस्वार्थीपणे काम करीत आहे, त्यांचा महाराष्ट्रासह अनेक राज्यात दांडगा संपर्क आहे याचा फायदा पक्षाला निश्चित होईल, ते खा.डाँ.विकास महात्मे यांचे कट्टर समर्थक आहे.