साईकिरण टाइम्स ब्युरो |दि. 15 मार्च 2020
घोडेगाव |दादा दरंदले | नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोडेगाव शाखेत नूतन ATM मशीन चे उद्घाटन युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भाग लक्षात घेता अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक ने आपल्या खातेदारांची शनिवारी व रविवारी होणारी गैरसोय लक्षात घेत घोडेगाव या ठिकाणी नव्याने येथे ATM मशीन सुरू केले आहे. दि १३ मार्च रोजी या नुतून ATM मशीन खातेदारांसाठी खुले करण्यात आले.
युवा नेते उदयन गडाख बोलताना म्हणाले की, सध्या कॅशलेस व्यवहारास महत्त्व आहे व सर्वांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून तसेच २४ तास आपली रोकड आपल्याला सोयीनुसार काढता यावी यासाठी ATM सेवा उपयोगी असल्याचे सांगितले. सर्व खातेदारांनी ATM सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी त्यावेळी केले. तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या महिला बचत गटाच्या योजनांची ची माहिती महिलांना द्यावी पोत्यातून महिला बचत गटांचे सक्षमीकरण करण्याचीही आव्हान केले.
त्यावेळी उपस्थित नानासाहेब रेपाळे अशोकराव येळवंडे दिलीपराव लोखंडे पं. स.सदस्य बाळासाहेब सोनवणे,ग्रा.प.सदस्य वसंतराव सोनवणे,महावीर नहार,सुहास गोंटे,राम सोनवणे,ज्ञानेश्वर सोनवणे,भास्कर सोनवणे,भावराव बऱ्हाटे,अशोक खाडे,विष्णू चौधरी,अविनाश येळवंडे,बाबासाहेब दारकुंडे,येळवंडे मेजर,नवनाथ वैरागर,राजेंद्र भोसले,प्रशांत लोंढे, तालुका विकास अधिकारी बाळासाहेब वाकचौरे शाखाधिकारी नागपुरे साहेब बचत गटाच्या महिलासह आदी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रामदास सोनवणे यांनी केले.
Tags
नेवासा