Coronavirus breaking
साईकिरण टाइम्स ब्युरो | 20 मार्च 2020
घोडेगाव-(दादा दरंदले) कोरोना च्या धास्तीने सर्वच क्षेत्रात सुरक्षिततेच्या कारणास्तव शासनस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत.याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 31 मार्च पर्यंत घोडेगाव दर शुक्रवारी भरणारा जनावरांचा बाजार रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी घोडेगाव बाजार प्रसिद्ध आहे या बाजारात जिल्ह्यासह शेजारील राज्यातूनही मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्रीसाठी नेहमी गर्दी होत असते.यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे लाखों रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोनो व्हायरस ने जगाच्या अनेक देशांत धुमाकूळ घातला आहे.कोरोनाचे संकट अगदी उंबरठ्यावर आल्याने त्याला आत न येऊ देण्यासाठी घोडेगाव येथे शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयाला प्रतिसाद देत घोडेगाव सह बाजारव्यापारी,नागरिक,शेतक-यांनी कडकडीत बंद पाळला असून प्रशासन,डॉक्टर सामाजिक संस्था नागरिक आपापल्या पद्धतीने जनजागृती करत आहेत.घोडेगाव व परिसरातील नागरिक कोरोना रोखण्यासाठी सरसावले असून कोरोनोचा पादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेत आहेत.
कोरोना मुळे बाजार बंद असल्याने आता म्हशी ची खरेदी विक्री थांबली आहे आर्थिक अडचण आहे.यात कशाबशा या म्हशी ची विक्री करण्याचा विचार होता पण आता या नंतर अपेक्षित दर मिळण्याची अपेक्षा कमीच राहील.
----- सुनिल नाथा वैरागर, (म्हैस व्यापारी )