सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करूनही नावात बदल करण्यासाठी नायगावच्या तलाठ्याची टाळाटाळ
साईकिरण टाइम्स ब्युरो |20 मार्च 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील तलाठ्याकडे, अर्जदार महिलेने विवाहानंतर नावात बदल झाल्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील गट नंबर 210 मधील नावात बदल करण्यासाठी अर्ज केला. सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करूनही तलाठ्याच्या निष्क्रिय कारभारामुळे अद्यापपर्यंत नावात बदल करण्यात आलेला नाही.
अर्जदार महिलेची मूळ गावी जमीन असून सदर जमीन सुमन मार्तंड बहिरट या नावाने खरेदी केलेली आहे ; परंतु पुढे वारस नोंदीसाठी अडचणी येऊ नये करिता सौ सुमन बाबासाहेब राशिनकर या नावाने बदल करण्याबाबत श्रीरामपूर तालुक्यातील मौजे नायगाव येथील कामगार तलाठी यांच्याकडे दिनांक 23 जुलै 2019 रोजी सर्व कागदपत्रे सादर केलेला होते. परंतु 8 महिने होऊनही कार्यवाही झालेली नाही.
तलाठी काम का करत नाही ??? प्रशासन तलाठ्यावर कारवाई करणार का ???
नायेगावच्या तलाठ्याकडे, अर्जदारांनी सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा केला. वारंवार चकरा मारल्या. काम होत नसल्याने तहसीलदारांकडे दोनदा अर्जही केला. तहसीलदारांनी मंडलाधिकारी यांना पुढील कार्यवाही करायला सांगितली; परंतु तलाठी व मंडलाधिकारी कार्यवाही करत नाही.
अर्जदार यांनी 14 जानेवारी 2020 रोजी पुन्हा विनंती अर्ज सर्व कागदपत्रे गॅजेट प्रत,आधार कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, सातबारा उतारा, पॅनकार्ड, सह अर्ज सादर केले. परंतु तरीही कार्यवाही झाली नाही म्हणून श्रीरामपूरचे तहसीलदार यांच्याकडे दोन वेळा अर्ज केला. तद्नंतर तहसीलदार यांनी नायगावच्या तलाठी यांना कार्यवाही करणेबाबत पत्र (जा क्र 1419/2018 कुळ कायदा,दि.22.11.2019) देऊनही नायगावच्या तलाठ्यांनी कार्यवाही केलेली नाही. सदर अर्जाबाबत त्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित होते ; परंतु त्यांनी पुढील कार्यवाही मंडलाधिकारी यांना करण्यास सांगितली परंतु अद्यापही ही कार्यवाही झालेली नाही. तहसीलदार यांच्या अादेशालाही तलाठ्याने केराची टोपली दाखवली आहे. त्यांच्यावर शिस्त व अपील या नियमानुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे. गावातील काही नागरिकांकडून या तलाठ्याची बदलीची मागणी होत आहे.